मृत्यूशय्येवरील पतीच्या शुक्राणूंसाठी पत्नीने न्यायालयाकडे मागितली दाद


22nd July 2021, 02:20 am
मृत्यूशय्येवरील पतीच्या शुक्राणूंसाठी पत्नीने न्यायालयाकडे मागितली दाद

मृत्यूशय्येवरील पतीच्या शुक्राणूंसाठी पत्नीने न्यायालयाकडे मागितली दाद
अहमदाबाद :
कोविड संक्रमणामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या पतीचे शुक्राणू (स्पर्म्स) मिळवून गर्भधारणेची इच्छा व्यक्त पूर्ण करण्यासाठी गुजरातच्या एका महिलेने उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. गुजरात उच्च न्यायालयानेही या महिलेची इच्छा पूर्ण करत तिला पतीचे शुक्राणू मिळवण्यासाठी मंजुरी दिली आहे.
संबंधित महिलेचा विवाह ऑक्टोबर २०२० मध्ये झाला होता. कॅनडामध्ये चार वर्षांपूर्वी एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर या दाम्पत्याने विवाहाचा निर्णय घेतला होता. विवाहानंतर सासर्‍यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी मार्च २०२१ मध्ये दांपत्य भारतात दाखल झाले. याच दरम्यान १० मे रोजीपासून पतीला करोना संक्रमणाने गाठले. प्रकृती नाजूक बनल्याने वडोदराच्या एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
करोना संक्रमण त्यांच्या फुफ्फुसात पोहोचल्याने ते हालचालही करू शकत नव्हते. त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना व्हेन्टिलेटर ठेवण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी महिलेला आणि तिच्या सासू-सासर्‍यांशी बोलताना डॉक्टरांनी पतीची तब्येत सुधारणार नाही, ते अखेरच्या घटका मोजत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे जास्तीत जास्त तीन दिवस आहेत, असेही डॉक्टरांचे म्हणणे होते.

हेही वाचा