Goan Varta News Ad

योगींच्या अचानक दिल्लीवारीमुळे खळबळ

|
11th June 2021, 12:50 Hrs

योगींच्या अचानक दिल्लीवारीमुळे खळबळ

लखनऊ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विसंवादाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आज अचानक योगींचा दिल्ली दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौर्‍यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

आपल्या दिल्ली दौर्‍यासाठी योगी आदित्यनाथ लखनऊहून निघाले आहेत. दुपारी १.०० वाजल्याच्या सुमारास ते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरून ते दिल्लीकडे रवाना होत आहेत. गुरुवारी दुपारी योगी आदित्यनाथ राजधानी दिल्लीत दाखल होत आहेत. दुपारी ४.०० वाजता योगी पहिल्यांदा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील. त्यानंतर योगी काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा आजचा मुक्काम दिल्लीतच असेल.

शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यानंतर दुपारी १२.३० मिनिटांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेट घेतील. ३.३० मिनिटांनी योगी दिल्लीत दाखल होती.

या भेटीगाठी दरम्यान आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या दौर्‍याआधी बुधवारी रात्री उशिरा योगींची भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटन मंत्री सुनील बन्सल यांच्यासोबत एक बैठक पार पडली. ही एक महत्त्वपूर्ण बैठक मानली जात आहे.