दिल्लीत ऑक्सिजन तुटवडा

- केंद्र सरकारने अखेर वाढवला कोटा

Story: नवी दिल्ली : |
22nd April 2021, 12:43 am
दिल्लीत ऑक्सिजन तुटवडा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. आता दिल्लीतील प्रमुख हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनमुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. यात अपोलो, मॅक्स, गंगाराम सिटी हॉस्पिटल, होली पॅमिली अशा हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिल्लीचा ऑक्सिजन कोटा वाढवला आहे. या बद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून केंद्राचे आभार मानले आहेत.
दिल्लीत सध्या १८ हजार जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दिल्ली सरकार समोर ऑक्सिजन वाहतुकीची आणखी एक समस्या आहे. हरयाणातील फरिदाबादच्या स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन वाहतूक करणारा टँकर अडवल्याची माहिती आहे. अशा प्रकारांमुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यात दिरंगाई होत आहे, असे सिसोदिया म्हणाले.
...................................................
अन् मोठी दुर्घटना टळली
राजधानी दिल्लीत ५०० करोना रुग्ण दाखल असलेल्या एका रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा ऑक्सिजन संपल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. वेळ हातातून निघून चालली असतानाच ऑक्सिजनचा टँकर पोहोचला आणि सर्वांना दिलासा मिळाला. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला असल्याचे सांगितल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन टँकर रुग्णालयात पोहोचला. रुग्णालयात गंभीर प्रकृती असणाऱ्या ५०० करोना रुग्णांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात रात्री २ वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता.
...................................
टाटा समुहाकडून
परदेशातून आयात
टाटा उद्योग समुहाने पुढाकार घेत २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मंगळवारी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक सिलिंडर्स आयात करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे.            

हेही वाचा