वाकाण वॉरियर्सचा पराभव करत केळावडे लिजेंड्स विजयी

केरी लिजेंडरी लीग : स्पर्धेत सात संघांचा सहभाग


22nd April 2021, 12:32 am

केरी-सत्तरी : केरी सत्तरी येथील युवकांनी अनुभवी खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी केरी लिजेंडरी लीग ही खास क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत ४० वर्षे पूर्ण केलेल्या केरी पंचायत क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. केरी पंचायतच्या प्रत्येक प्रभागनिहाय संघ करण्यात आले व त्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करून अनुभवी खेळाडूंना एकत्र पाहण्याची संधी मिळाली.
या स्पर्धेत एकूण ७ संघ सहभागी झाले होते. यामध्ये वाकाण वॉरियर्स, बाहेरीलवाडा लिजेंड्स, नाझिम वॉरियर्स, सातेरी आजोबा, घोटेलीम लिजेंड्स, युनायटेड शिरोलीयन्स, केळावडे लिजेंड्स या संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये केळावडे लिजेंड्सने  विजय प्राप्त करत वाकाण वॉरियर्सचा पराभव केला.
प्रथम पारितोषिक व चषक पांडुरंग विष्णु गावस आणि बंधू यांनी पुरस्कृत केले होते. द्वितीय पारितोषिक उमेश साटेलकर यांनी पुरस्कृत केले होते. अनिल गावस घोटेली नं. २ पुरस्कृत तिसरे पारितोषिक सातेरी आजोबा यांना प्राप्त झाले. तर प्रशांत हुळणकर पुरस्कृत चौथे पारितोषिक बाहेरीलवाडा लिजेंड्स यांना मिळाले.
उत्कृष्ट फलंदाज म्हणून सिद्धेश गावस (वाकाण वॉरियर्स) याला आझाद करोल पुरस्कृत, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कृष्णा गावस (वाकाण वॉरियर्स) याला आझाद करोल पुरस्कृत, सर्वोत्कृष्ट खेळाडू विजय गावस (केळावडे लिजेंड्स) याला सानवी साऊंडस अँड लाइट्स सतीश गावस पुरस्कृत, शिस्तबद्ध संघ म्हणून युनायटेड शिरोलीयन्स संघाला प्रवीण पार्सेकर पुरस्कृत, तर उत्कृष्ट लिजेंडरी संघ म्हणून नाझिम वॉरियर्स यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी केरी गावातील अनेक दिग्गज खेळाडूंचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सर्व भेटवस्तू केरी क्रिकेटर्सतर्फे पुरस्कृत केल्या होत्या. सर्व सामन्यांचे सामनावीर पुरस्कार यशवंत गावस यांनी पुरस्कृत केले. या स्पर्धेला सर्व सामन्यांसाठी चेंडू तुषार राणे, विश्वजीत पाटील व कृष्णकांत माजिक यांनी पुरस्कृत केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय परब यांनी विशेष परिश्रम घेतले व युवक राजेश गावस, सिद्धेश गावस, मनोज गावस, चेतन गावस, कृष्णकांत माजिक, रामदास शेटकर, विशांत केरकर दीपक गावस यांनी विशेष सहकार्य केले. बक्षीस वितरण समारंभाला केरीचे सरपंच दाऊद सय्यद, पंच लक्ष्मण गावस, अनिल गावस, तुषार राणे, प्रवीण पार्सेकर, गोपीनाथ गावस, चंद्रकांत नारायण गावस उपस्थित होते. यावेळी रमाकांत गावस, सीताराम गावस, गणपत गावस, रणजित राणे यांनी आपले मत व्यक्त करून पूर्वीच्या स्मृतींना उजाळा दिला.