Goan Varta News Ad

दोन बायोमिथेनेशन प्रकल्पांचे काम ऊर्जा बायोसिस्टमला

- घाऊक मच्छीमार्केटनजीकचे काम अॅटमॉस कंपनीला, मुख्याधिकाऱ्यांची माहिती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th February 2021, 11:30 Hrs
दोन बायोमिथेनेशन प्रकल्पांचे काम ऊर्जा बायोसिस्टमला

मडगाव : मडगाव पालिका क्षेत्रातील एसजीपीडीएनजीक उभारण्यात येणाऱ्या तीन प्रकल्पांसाठी दाखल झालेल्या निविदा शुक्रवारी खोलण्यात आल्या. प्रकल्प उभारणी व देखभाल दुरुस्तीच्या दोन ठिकाणचे काम उर्जा बायोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला; तर घाऊक मच्छीमार्केटनजीक प्रकल्प उभारणीचे काम अॅटमॉस पॉवर प्रा. लि. कंपनीला मिळाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली. आता या निविदा मंजुरीसाठी जीसुडाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
मडगाव पालिकेकडून एसजीपीडीए मार्केट परिसरात पाच टन प्रति दिन कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या बायोमिथेनेशन प्रकल्पाच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आलेल्या होत्या. तीन जागांवर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. एसजीपीडीए घाउक मच्छीमार्केट, किरकोळ मच्छी मार्केट, भाजी मार्केट अशा तीन ठिकाणी प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी निविदा खोलण्यात आल्यानंतर मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी प्रकल्प उभारणीचे काम उर्जा व अॅटमॉस कंपनींना मिळाल्याचे स्पष्ट केले. फर्नाडिस यांनी सांगितले की, घाऊक मच्छीमार्केट येथील प्रकल्प उभारणीसाठी तीन जणांकडून निविदा दाखल झाल्या होत्या. एसजीपीडीए घाऊक मच्छीमार्केटमधील प्रकल्प उभारणीसाठी अॅटमोस पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, उर्जा बायोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेड व अवनी इंटरप्रायजेस या तीनपैकी अॅटमोस पॉवर या कंपनीने दाखल केलेली २.३९ कोटीची रक्कम ही इतर निविदांपेक्षा कमी असल्याने अॅटमॉस पॉवर कंपनीला प्रकल्प उभारणीची निविदा प्राप्त झाली आहे. या प्रकल्पासाठी अवनी इंटरप्रायजेसतफ २ कोटी ४० लाख २९७७५ तर उर्जा बायोसिस्टमतफ दोन कोटी ४० लाख ८७ हजाराची निविदा भरण्यात आली होती. एसजीपीडीए किरकोळ मार्केटमधील प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यात अॅटमॉस पॉवर प्रायव्हेट लिमिटेडतफ २ कोटी ४३ लाख ७४ हजार ७०० रुपयांची तर ऊर्जा बायोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडतफ २ कोटी ४० लाख ८७ हजार २६२ रुपयांची निविदा रक्कम भरण्यात आली होती. ऊर्जा बायोसिस्टमची रक्कम दुसऱ्या कंपनीपेक्षा कमी असल्याने किरकोळ मार्केटनजीकच्या प्रकल्पांचे काम ऊर्जा बायोसिस्टमला देण्यात आले; तर एसजीपीडीए किरकोळ मच्छीमार्केट मधील प्रकल्प उभारणीसाठीही दोन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. अॅटमॉस पॉवर प्रायव्हेट लिमिटेडतफ २ कोटी ४३ लाख ७४ हजार ७०० रुपयांची तर उर्जा बायोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडतफ २ कोटी ४० लाख ८७ हजार २६२ रुपयांची निविदा रक्कम भरण्यात आली होती. त्यामुळे किरकोळ मच्छीमार्केटनजीकच्या प्रकल्पाचे कामही ऊर्जा बायोसिस्टम या कंपनीलाच प्राप्त झाले आहे. या निविदा खोलण्यात आल्यानंतर आता गोवा साधन सुविधा विकास महामंडळातफ मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहितीही मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली.
....