'पीएसआय' अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना; 'अर्जप्रक्रियेत तांत्रिक बिघाड, १४ जुलैपूर्वी...'

क्रीडापटूंच्या गटात अर्ज केलेल्यांना करावी लागणार खालील प्रक्रिया

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
'पीएसआय' अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना; 'अर्जप्रक्रियेत तांत्रिक बिघाड, १४ जुलैपूर्वी...'

पणजी : कर्मचारी भरती आयोगाच्या जाहिरातीला अनुसरून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी अर्ज केलेल्या ५९८ उमेदवारांची माहिती तांत्रिक दोषामुळे अंतिम अर्जात समाविष्ट झाली नाही. त्यानी १४ जुलैपर्यंत CBES पोर्टलवर लॉग इन करून गुणवान क्रीडापटूंच्या गटासाठी अर्ज केलेला आहे का? यावर होय किंवा नाही (yes or no) हे कळविणे आवश्यक आहे.

२ मे ते ५ मे या कालावधीत 'पीएसआय' पदासाठी अर्ज (Recruitment) केलेल्या ५९८ अर्जदारांची वरील माहिती नोंद झालेली नाही. माहिती नोंद न झालेल्या उमेदवारांची यादी कर्मचारी भरती आयोगाच्या संकेतस्थळावर (gssc.goa.gov.in) उपलब्ध आहे. १४ जुलैपूर्वी त्यांनी वरील माहिती (येस/नो) दिली नाही तर ते गुणवान क्रीडापटूंच्या गटातील उमेदवार नाहीत असे ग्राह्य धरले जाईल, असे आयोगाने नोटीस जारी करून कळविले आहे.

हेही वाचा