
सांगे : गोव्यातील (Goa) सांगे तालुक्यातील (Sanguem Taluka) विलियण येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सुमारे १.६५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सांगे पोलिसांनी (Sanguem Police) अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलियण येथील रहिवासी मनीषा नाईक यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १० मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप उघडून चोरट्याने ४ ग्रामाचे सोन्याचे कडे, अंदाजे ८ ग्रामाच्या चार अंगठ्या, १ ग्रामाचे सोन्याचे लॉकेट, २ ग्रामाची कर्णफुले मिळून सुमारे १.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी सांगे पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक कविता रावत अधिक तपास करीत आहेत.