१७ लाख ते ६३ लाखांपर्यंतची किंमत ; अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ ऑगस्ट
पणजी : गोवा गृहनिर्माण मंडळाने त्यांच्या ताब्यातील १६ भूखंडांचा ई-लिलाव जाहीर केला आहे. या भूखंडांची किंमत त्यांच्या आकारानुसार १७ लाख ते ६३ लाख रुपयांपर्यंत असून, जास्तीत जास्त बोली लावणाऱ्या इच्छुकांना हे भूखंड विक्रीसाठी उपलब्ध असतील. गोवा गृहनिर्माण मंडळाने इच्छुकांना या भूखंडांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे.
मंडळाने कुडका येथे ६, थिवी ३, पाडोशे ४ आणि शेल्डे येथे ४ असे एकूण १६ भूखंड थेट ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. इच्छुक उमेदवारांकडून केवळ ई-अर्जाद्वारे (ऑनलाइन) अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज भरण्यासाठी ८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत गोवा गृहनिर्माण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
कुडका येथे २९७ चौ.मी. ते ३३७ चौ.मी. दरम्यान पाच भूखंड उपलब्ध आहेत. याची किंमत १८,७०५ कोटी प्रति चौ. मी. आहे. ५ पैकी एक भूखंड कुडका येथील स्थानिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. थिवी येथे ५६० ते ३१७ चौ.मी. मध्ये तीन भूखंड उपलब्ध आहेत. यांची किंमत रु. १० लाख आहे. हे तिन्ही भूखंड सर्वसामान्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेल्डे येथे ३४२ ते ३३१ चौ.मी. दरम्यान चार भूखंड उपलब्ध आहेत. यांची किंमत ६,१०० कोटी रु. प्रति चौ. मी. आहे. हे सर्व भूखंड सर्वसामान्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पाडोशे येथे २९० ते ३४२ चौ.मी. दरम्यान ४ भूखंड उपलब्ध आहेत. यापैकी ३३८ चौ.मी. आकाराच्या भूखंडासाठी ५,४०० रुपये प्रति चौ.मी. दर आहे, तर उर्वरित भूखंडांची किंमत ६,१०० कोटी रु. प्रति चौ.मी. आहे या ४पैकी एक भूखंड स्थानिकांसाठी राखीव आहे.
अर्ज करण्यासाठी अटी व शुल्क
- या भूखंडांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा २.१६ लाख रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांना २ लाख रुपये मूळ ठेव (मूळ ठेवीची रक्कम) आणि २ हजार रुपये नोंदणी शुल्क (जीएसटीसह ३५० रुपये) भरावे लागतील.
- हे नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही, अशी माहिती मंडळाने दिली आहे.