Goan Varta News Ad

कासारवर्णेत आग

|
22nd November 2020, 12:48 Hrs
कासारवर्णेत आग

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पेडणे : आरोग्य खाते कासारर्वणे येथे शॉर्ट सर्किट होऊन २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. २० रोजी रात्री कासारवर्णे येथील हॉस्पिटलमध्ये   मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याची माहिती डॉ. संचिता सावळ यांनी अग्निशमन दलाला दिली.

अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. धूर येत असलेल्या खोलीत रुग्ण होता. आग विझवून दलाने वीज विभागाला कळवले. अग्निशमन दलाने १ लाखाहून अधिक रुपयांची मालमत्ता वाचवली. या मोहिमेत अग्निशमन दलाचे सहाय्यक अधीकारी प्रशांत धारगळकर, चालक शैलेश हळदणकर, जवान विशाल पाटील, संदेश पेडणेकर, आशीर्वाद गाड सहभागी झाले होते.