राष्ट्रकुल खेळांमध्ये आता महिला क्रिकेट

८ संघांचा सहभाग; यजमान म्हणून इंग्लंडच्या महिलांना थेट संधी


18th November 2020, 11:19 pm
राष्ट्रकुल खेळांमध्ये आता महिला क्रिकेट

बर्मिंगहम : बर्मिंगहम येथे २०२२ साली रंगणार्‍या राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन यांनी गुरुवारी याबद्दल अधिकृत घोषणा केली. महिला क्रिकेटला राष्ट्रकुल खेळांमध्ये संधी मिळण्याची ही पहिली वेळ मानली जात आहे.

२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान बर्मिंगहम येथे राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेट खेळवण्याची ही पहिलीच वेळ असली तरीही १९९८ साली क्वालालांपूर राष्ट्रकुल खेळांमध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा सहभाग करण्यात आला होता. ८ संघांना या स्पर्धेत सहभाग मिळणार आहे. यजमान देश म्हणून इंग्लंडच्या महिलांना यात थेट संधी मिळणार असून १ एप्रिल २०२१ पर्यंत टी-२० क्रमवारीत पहिल्या ६ क्रमांकावर असणारे महिला संघही या स्पर्धेसाठी थेट पात्र होतील. उर्वरित दोन संघांना क्वालिफायर सामन्यांतून आपले स्थान मिळवावे लागणार आहे.