हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी ज्ञानेंद्र निंगोमबम


07th November 2020, 09:34 pm

नवी दिल्ली : हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मणिपूरच्या ज्ञानेंद्र निंगोमबम यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेचा भंग केल्यामुळे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांना केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे निर्देश दिले होते. आता अहमद यांच्या जागी ज्ञानेंद्र निंगोमबम यांची अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. अहमद अध्यक्षपदावरून पायउतार झाले असले तरी ते महांघात कायम राहतील. हॉकी इंडियाच्या अधिवेश व निवडणुकीत ते वरिष्ठ उपाध्यक्षपदावर अविरोध निवडून आले आहेत. निंगोमबम हे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान होणारे ईशान्य भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. गत जुलै महिन्यात अहमद यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव अध्यक्षदाचा राजीनामा सादर केला होता व हंगामी अध्यक्ष म्हणून निंगोमबम हे काम पाहत होते. नंतर क्रिडा मंत्रालयाने अहमद यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. निंगोमबम यांची निवड दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे.