राहुल गांधींसह विरोधकांची टीका

- उपसभापतींविरोधात अविश्वास दाखल करणार!

Story: दिल्ली : |
21st September 2020, 12:50 am
राहुल गांधींसह विरोधकांची टीका
दिल्ली : राज्यसभेत कृषिसंबंधी विधेयके मंजूर करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकावर जोरदार टीका सुरू आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकर्‍यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढले असल्याची टीका त्यांनी केलीय. तर १२ विरोधी पक्षांनी राज्यसभेच्या उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे, असे अहमद पटेल यांनी माध्यमांसमोर सांगितले.
 राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे आसू आणत आहे. राज्यसभेत कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकर्‍यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे.
दरम्यान, प्रचंड नाराज झालेले विरोधी पक्ष राज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी सांगितले. शिवाय, आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल, असे देखील त्यांनी बोलून दाखवले. राज्यसभा उपसभापती हरिवंश यांनी लोकशाहीच्या परंपरेचे रक्षण करायला हवे. मात्र, या ऐवजी त्यांच्या वागणुकीमुळे आज लोकशाही परंपरा आणि प्रक्रियेस नुकसान पोहोचवले आहे. यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे अहमद पटेल म्हणाले. ज्या प्रकारे ही विधेयके मंजूर करण्यात आली आहेत, ते लोकाशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. १२ विरोधी पक्षांनी राज्यसभेच्या उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे, असे देखील पटेल यांनी सांगितले.