मुरगाव बंदर संघाला क्रिकेटचे अजिंक्यपद

स्पर्धा झुआरीनगर येथील बिस्ट्स पिलानी मैदानावर खेळविण्यात आली होती.


05th February 2018, 03:45 am


क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता

वास्को :   अखिल भारतीय कॉर्पोरेट लगेच व संभव क्रीडा व कल्चरल क्लब यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित टी- २० क्रिकेट स्पर्धेत मुरगाव बंदर संघाने केरळच्या माक्रोफीन संघावर ६ गडी राखून पराभव करत अजिंक्यपद मिळविले. ही स्पर्धा झुआरीनगर येथील बिस्ट्स पिलानी मैदानावर खेळविण्यात आली होती.      

या स्पर्धेत एकूण आठ संघाना निमंत्रित करण्यात आले होते. ही स्पर्धा ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१८ अशी तीन दिवस घेण्यात आली होती. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुथोन मायक्रोफीन केरळचे सर्वगडी १५ षटकांत ८८ धावात बाद झाले. त्यात सुदेशने ३० तर सुजेशने २० धावा 

केल्या. 

मुरगांव बंदर संघाच्या धीरज नार्वेकरने ३ तर बसाप्पा मदारने ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मुरगाव बंदर संघाच्या धीरज नार्वेकरने नाबाद ५० धावा व आरिफ शेखच्या २५ धावांच्या जोरावर १४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ९३ धावा करत अजिंक्यपद मिळवीले.       

 या सामन्यातील उत्कृष्ट फलंदाज प्रदीप (केरळ), उत्कृष्ट गोलंदाज बसाप्पा मदार, सामनावीर  व मालिकावीर धीरज नार्वेकर (दोन्ही मुरगाव बंदर संघ) यांना देण्यात 

आला.