बुजुर्गांच्या एकेरी, दुहेरीत शीतल भोसले विजेता


01st February 2018, 03:07 am

पणजी : गद्रे गास्पर डायस खुल्या टेनिस स्पर्धेतील बुजुर्गांच्या पुरुष एकेरी व  दुहेरीत  अनुभवी शीतल भोसलेने अजिंक्यपद पटकाविले. एकेरी सामन्यात त्यांनी  अजित कुलकर्णी यांचा ६-१ सेट्सने  पराभव केला तर दुहेरीत मोहून घाटगे यांना जोडीला घेऊन अब्दूल रहिमान व गणेश पै जाडीचा ६-२, ६-४ असा पराभव केला.            

४५ वर्षांवरील बुजुर्गांच्या एकेरी स्पर्धेत राजेंद्र (बाळू) गुदिन्हो यांनी पराग यांचा ६-३, ६-२  असा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. दुहेरी ९० मध्ये येनेपोया फरहाद व अब्दूल सालेम जोडीने केव्हीन रिबेलो  सचिन दुकले जोडीचा रंगतदार सामन्यात ६-२, ३-६, व १०-७ असा पराभव केला.       

पुरुष दुहेरी ११० मध्ये अजित कुलकर्णी व राजेंद्र निंबाळकर यांनी पृथ्वीराज इंगळे व दिलीप केरकर जोडीचा ४-३, ४-० असा पराभव केला. ही टेनिस स्पर्धा एकूण १४ श्रेणीत घेण्यात येत असून अंतिम सामने ४ फेब्रुवारीला होणार आहेत.