सत्तरी व्हॉलिबॉल प्रीमियर लीगमध्ये भिरोंडा ब्लास्टर्स संघ जेता

ड्रॅगन हंटर्स संघाला उपविजेतेपदावर समानधान मानावे लागले.


05th February 2018, 03:44 am


वाळपई : सत्तरी व्हॉलिबॉल क्लब आयोजित पहिल्या सत्तरी व्हॉलिबॉल प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भिरोंडा ब्लास्टर्स संघाने ड्रॅगन हंटर्स वाळपई संघावर मात करून लीगचे अजिंक्यपद पटकावले. ड्रॅगन हंटर्स संघाला उपविजेतेपदावर समानधान मानावे लागले.             

स्काय बॉईज वांते संघाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. प्लेयर ऑफ टुर्नामेंट उमेश राणे -भिरोंडा क्लास्टर्स, बेस्ट स्मॅशर धनराज धुरी -ड्रॅगन हंटर्स, बेस्ट लिप्टर विशाल -ड्रॅगन हंटर्स, बेस्ट डिकेंडर सुरज नाईक - ड्रॅगन हंटर वाळपई, इमर्जिंग प्लेयर दिगेश गावकर-फायटींग बुल्स वाळपई या खेळाडूंना स्पर्धेची वैयक्तिक बक्षिसे प्राप्त झाली.            

अंतिम सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री व पर्येचे विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे, विजयादेवी राणे, विश्वधारा डहाणूकर, आयोजन समितीचे अध्यक्ष सगुण वाडकर, आयोजन समितीचे उपाध्यक्ष दीपक नार्वेकर, उपाध्यक्ष विनोद शिंदे, गोवा व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आयर्वीन सुवारीस, भिरोंडा संघाचे अध्यक्ष इस्तेव आंद्राद, सचिव आनंद गावकर, पॅट्रिमन आंद्राद, सरपंच नितीन शिवडेकर, पंच उदयसिंग राणे उपस्थित होते.             

यावेळी प्रतापसिंग राणे यांचा वाढदिवस असल्यामुळे आयोजन समितीच्या वतीने व्हॉलिबॉल कोर्टावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रतापसिंग राणे व अन्य मान्यवरांनी प्रदर्शनीय सामन्यातील गोवा पोलिस व श्री शिवशंभो संघाच्या खेळाडूंची ओळख करून घेतली.            

यावेळी खास कार्यक्रमात बोलताना प्रतापसिंग राणे यांनी आयोजन समितीने केलेल्या उत्कृष्ट आयोजनबाबत कौतुक केले. व्हॉलिबॉल खेळाच्या माध्यमातून तरुण मुले तंदुरुस्त राहतात व त्यांच्यात आत्मविश्वास वाढीस लागतो, असे राणे म्हणाले.             

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पर्धा आयोजनासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने आभार मानले. यावेळी दीपक नार्वेकर संपादित व्हॉलिबॉल स्मरणिकेचे प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अंतिम सामन्यातील विजेत्यांना आयोजन समितीचे अध्यक्ष सगुण वाडकर, उपाध्यक्ष दीपक नार्वेकर, उपाध्यक्ष विनोद शिंदे, आनंद गावकर, पॅट्रिमन आंद्राद, सरपंच नितीन शिवडेकर, संजय सावळ व उदयसिंग राणे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.