मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून, वडिलांनी केला बॉयफ्रेंडचा खून

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 02:03 pm
मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून, वडिलांनी केला बॉयफ्रेंडचा खून

गाझियाबाद : यूपीच्या गाझियाबादमध्ये एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांनी विद्यार्थ्यावर पाच गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे प्रकरण गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातील आहे. पोलिस उपायुक्त (ग्रामीण) विवेक चंद्र यादव म्हणाले, 'बीटेकचा विद्यार्थी विपुल (२५) याची निवृत्त सुरक्षा कर्मचाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये घडली.

आरोपी राजेश कुमार सिंग हा बीएसएफमधून निवृत्त झाला असून तो सध्या एका खासगी सुरक्षा फर्ममध्ये कार्यरत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, विपुलचे आरोपीच्या मुलीसोबत संबंध होते. आरोपी रात्री विपुलच्या फ्लॅटवर पोहोचला. तेथे त्याचा विपुलसोबत वाद झाला आणि त्यानंतर त्याने विपुलवर पाच गोळ्या झाडल्या. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.