‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेत झेव्हियरला दुसरे रौप्य पदक

र्धेचे आयोजन केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाने केले आहे.


05th February 2018, 03:44 am


नवी दिल्ली : ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत गोव्याने जलतरण स्पर्धेत आपले पाचवे पदक कमावले. या स्पर्धेचे आयोजन केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाने केले आहे. 

नवी दिल्ली येथे चालू असलेल्या या स्पर्धेतील जलतरण प्रकारात गोव्यातर्फे चांगली कामगिरी बजावणाऱ्या झेव्हियर मायकल डिसोझाने २०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात २:०८:५९ अशी वेळ नोंदवत दुसरे रौप्य पदक मिळवले. तर कर्नाटकच्या श्रीहरी नटराज याने २:०५:७८ अशी वेळ नोंदवून सुवर्ण पदकावर नाव कोरले. मध्य प्रदेशच्या अद्वैत पागेने २:०८:९९ अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. 

तत्पूर्वी १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत गोव्याला या स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक झेव्हियर मायकल डिसोझाने पटकावून दिले होते. तर  ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये झिदान सय्यदला रौप्य पदक व मुलींच्या ४०० मीटर वैयक्तिक स्पर्धेत श्रुंगी बांदेकरला रौप्य पदक मिळाले होते.      

==============