ताळगाव पंचायतीची आज निवडणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 12:16 am
ताळगाव पंचायतीची आज निवडणूक

पणजी : ताळगाव पंचायत निवडणूक रविवार, दि. २८ एप्रिल रोजी होत आहे. सात प्रभागांतील मतदानात ११ हजार ९८८ मतदार १४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. एकूण ११ प्रभाग असलेल्या ताळगाव पंचायतीमधून चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

ताळगाव पंचायत निवडणुकीत चुरशीचा सामना पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या पॅनलचे उमेदवार, ताळगांव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटल फ्रंट आणि युनायटेड ताळगावकार संघटित विरोधी पक्ष आमनेसामने येणार आहेत. सर्व प्रभागात दोन उमेदवार रिंगणात आहेत. ‘इंडी’ आघाडी बाबूश पॅनलविरुद्ध निवडणूक लढवत आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि आरजीपी हे एकत्र आले आहेत.

हेही वाचा