दहा पंचायतीत २३ जून रोजी पोटनिवडणूक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 12:32 am


पणजी :
राज्यातील दहा पंचायतींमधील विविध १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. पंचायत खात्याचे सचिव संजय गोयल यांनी नुकतीच याबाबत अधिसूचना काढली आहे. निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
अधिसूचनेनुसार कुंडई येथील प्रभाग क्रमांक ७ (महिला), वळवई येथील प्रभाग क्रमांक २ (सर्वसाधारण), केरीतील प्रभाग क्रमांक ३ (एसटी), राशोल येथील प्रभाग क्रमांक ५ (एसटी महिला), असोळणातील प्रभाग क्रमांक १ (महिला), सुरावली प्रभाग क्रमांक २ (महिला), कुडणे प्रभाग क्रमांक २ (सर्वसाधारण), शेल्डे प्रभाग क्रमांक २ (ओबीसी), सुकूर प्रभाग क्रमांक १० (एससी) आणि बोरी येथील प्रभाग क्रमांक ११ (सर्वसाधारण) या प्रभागात पोटनिवडणूक होणार आहे.       

हेही वाचा