राजभाषेसाठी मतांतून चमत्कार घडवा  : गायधनी

मराठी राजभाषा साहित्य संमेलन उत्साहात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 12:21 am
राजभाषेसाठी मतांतून चमत्कार घडवा  : गायधनी

पणजी : गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मराठी​ मतदारांनी राज्यकर्त्यांना मतांच्या माध्यमातून चमत्कार घडवून दाखवावा, असे आवाहन ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी केले. मराठी असे आमुची मायबोली व गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पर्वरीत आयोजित मराठी राजभाषा साहित्य संमेलनात उद्घाटक या नात्याने ते बोलत होते.


संमेलनाध्यक्ष गो. रा. ढवळीकर, प्रकाश भगत, कार्याध्यक्ष पूर्णिमा देसाई, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर, गुरुदास सावळ, संजय हरमलकर, अॅड. अमित सावंत, डॉ. गुरुदास नाटेकर, प्रभाकर ढगे उपस्थित होते.

राज्य सरकारने मराठी भाषेबद्दल सहिष्णुता दाखवावी आणि मराठीला हक्काचे राजभाषापद बहाल करावे, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.

हेही वाचा