देशात १ कोटींहून अधिक सरकारी नोकऱ्या उपलब्ध; आले ८७ लाख अर्ज, वाचा एनसीएसचा अहवाल

भारतीय तरुणांमध्ये सरकारी नोकऱ्यांची प्रचंड क्रेझ आहे. दरवर्षी लाखो तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करतात. असे काही लोक आहेत जे आपल्या आयुष्यातील ५-७ वर्षे सरकारी नोकरीच्या तयारीत घालवतात. नॅशनल करिअर सर्व्हिस नावाच्या सरकारी जॉब पोर्टलने १ कोटींहून अधिक सरकारी नोकऱ्यांची यादी केली होती. यासाठी सुमारे ८७ लाख अर्ज आले आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 12:56 pm
देशात १ कोटींहून अधिक सरकारी नोकऱ्या उपलब्ध; आले ८७ लाख अर्ज, वाचा एनसीएसचा अहवाल

नवी दिल्ली : भारतात राज्य आणि केंद्र पातळीवर अनेक सरकारी नोकऱ्यांची नॉटिफिकेशन्स येत असतात. सरकारी नोकरी करू इच्छिणारे तरुण विविध जॉब पोर्टलवर भेट देऊन मनाजोगत्या नोकऱ्यांचे पर्याय निवडतात आणि त्यांच्या परीक्षांची तयारी करतात. मुळातच सरकारी नोकरी शोधणे हीच खूप मोठी प्रक्रिया आहे. हीच प्रक्रिया सुलभ बनवण्याकरीता सरकारने नेशनल करियर  सर्विसेस या नावाने एक जॉब पोर्टल सुरू केले आहे. ncs.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही नोकऱ्यांच्या यादी तपासून घेऊ शकतात. How to register and apply for jobs with NCS (National Career Service)

नेशनल करियर सर्विसेसने काही आश्चर्यकारक आकडे शेअर केले आहेत. जर आपण नॅशनल करिअर सर्व्हिसेसच्या डेटावर नजर टाकली तर, या पोर्टलवर सुमारे १.०९ कोटी नोकऱ्या सूचीबद्ध आहेत. मात्र या सरकारी नोकऱ्यांसाठी अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा कमीच दिसत आहे. .National Career Service (NCS) portal registers record-breaking 35.7 lakh  vacancies in 2022-23 - India Today

सरकार कोणतेही असो, तरुणांसाठी रोजगार हाच सर्वात मोठा प्रश्न राहिला आहे. नॅशनल करिअर सर्व्हिसेस नुसार, २०२३ -२४  या आर्थिक वर्षात पोर्टलवर एकूण १,०९,२४,१६४  रिक्त पदांची यादी जाहीर करण्यात आली होती. परंतु पोर्टलवर नोंदणी केलेल्या व नोकरी शोधणाऱ्यांपैकी केवळ ८७,२७,९०० तरुणांनी या नोकऱ्यांसाठी अर्ज केले.Job vacancies listed on National Career Service portal surge past 10 lakh  mark in August

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२४ मध्ये २१४ टक्के अधिक रिक्त जागा जॉब पोर्टलवर सूचीबद्ध केल्या गेल्या आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात या पोर्टलवर ३४,८१,९४४ नोकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या लोकांच्या संख्येवर नजर टाकल्यास त्यात ५३ टक्के वाढ झाली आहे.Emerging Careers in the USA- Jobs in USA for International Students | IDP  India

२०२३-२४  या आर्थिक वर्षात, वित्त आणि विमा क्षेत्रात (फायनान्स जॉब्स) सर्वाधिक ४६,८६,८४५  रिक्त पदांची नोंद झाली. यानंतर, क्रीडा क्षेत्रातील १४,४६,४०४ नोकऱ्या आणि नागरी आणि बांधकाम क्षेत्रातील ११,७५,९००  नोकऱ्यांच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या. सरकारने एका विशेष उद्देशासाठी एनसीएस तयार केला आहे. त्यात देशात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या नोकऱ्यांचा डेटाबेस आहे. खाजगी क्षेत्रातील लोक देखील या पोर्टलवर त्यांच्या नोकऱ्यांची यादी जाहीर  करू शकतात. What are your views on National Career Service (NCS)? - Quora