सासष्टीतील हे दोन दिग्गज ख्रिश्चन नेते पहिल्यांदाच निवडणुकीपासून दूर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
28th April, 01:05 pm
सासष्टीतील हे दोन दिग्गज ख्रिश्चन नेते पहिल्यांदाच निवडणुकीपासून दूर

पणजी : मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रचाराची रंगत वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेले आहे. आजी, माजी मंत्री, आमदार व सर्व पक्षांचे लहान-मोठे नेते प्रचारात गर्क असताना लुईझिन आणि चर्चिल हे दोन माजी मुख्यमंत्री मात्र निवडणूक वा प्रचारापासून दूर आहेत. अलीकडच्या वर्षातील वा निवडणुकीत दिसलेले हे दुर्मिळ चित्र आहे. गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा - Marathi  News | ncp mla churchill alemao trying hard to bring congress government in  goa | Latest goa News at Lokmat.com

लुईझिन फालेरो आणि चर्चिल आलेमाव या दोघांनीही राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे. चर्चिल हे दोन वेळा लोकसभेवर निवडून आलेले आहेत, तर लुईझिन हे राज्यसभेचे खासदार होते. लुईझिन यांचे नावेली विधानसभा मतदारसंघात, तर चर्चिल यांचे बाणावली मतदारसंघात वर्चस्व आहे. मागील विधानसभा निवडणुकीत चर्चिल पराभूत झालेले असले, तरी बाणावलीसह नावेली मतदारसंघात त्यांचे कार्यकर्ते आहेत. यापूर्वी एका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीत ते विजयी झालेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही नेते दक्षिणेत सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या सासष्टी तालुक्यातील आहेत. तरीही या दोघांनी लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त राहणेच पसंत केले आहे. 

Goa Election : राजधानी पणजीत तृणमूल उमेदवाराविना... | पुढारी

मी सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेलो आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त आहे

लुईझिन फालेरो

लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना लुईझिन फालेरो म्हणतात, मी आता राजकारणातून निवृत्त झालेलो आहे. माझे आता लेखनावर अधिक लक्ष आहे. उमेदवार तसेच राजकीय पक्षांचे नेते बर्‍याच दिवसांपूर्वी पाठिंब्यासाठी मला भेटले होते. तरीही लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.फालेरोंच्या पराभवानंतरच आलेख चढला - Marathi News | Luizin Falero Political  News | Latest goa News at Lokmat.com

लुईझिनप्रमाणे चर्चिल मात्र राजकारणातून निवृत्त झालेले नाहीत. माझे कार्यकर्ते तसेच लोकांसोबतच मी राहणार आहे. यावेळी कोणत्याच पक्षाने वा उमेदवाराने जाहीर सभेसाठी वा प्रचारासाठी मला अजूनपर्यंत निमंत्रित केलेले नाही. यावेळी कोणत्याच पक्षाचा किंवा उमेदवाराचा मी जाहीरपणे प्रचार करणार नाही. संपूर्ण दक्षिण गोव्यात माझे कार्यकर्ते आणि मतदार आहेत, असे चर्चिल आलेमाव म्हणाले. 

चर्चिल आलेमाव यांचा आज तृणमूलमध्ये प्रवेश | Churchill Alemao

कोणत्याच उमेदवाराने वा राजकीय पक्षाने मला प्रचारासाठी निमंत्रित केलेले नाही. या निवडणुकीत जाहीर प्रचारापासून मी दूरच राहणार आहे

चर्चिल आलेमाव

दक्षिण गोव्यात बहुतांश वेळा अल्पसंख्याक (ख्रिस्ती) उमेदवार विजयी झालेला आहे. या स्थितीत लुईझिन आणि चर्चिल या दिग्गज ख्रिस्ती नेत्यांच्या अलिप्तपणाचा लाभ कोणाला होईल, या बद्दल राज्यात उत्सुकता आहे.Goa's women politicians: Wives, daughters and also-rans | Latest News India  - Hindustan Times




हेही वाचा