हैदराबादहून गोव्यात बसमधून १२ किलो गांजाची तस्करी; गुन्हा शाखेकडून पर्दाफाश

१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक; हैदराबादहून आंतरराज्य प्रवासी बसमधून गोव्यात आणण्यात येत असलेल्या गांजाच्या तस्करीचा गुन्हा शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १२ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत १२ लाख रुपये आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
हैदराबादहून गोव्यात बसमधून १२ किलो गांजाची तस्करी; गुन्हा शाखेकडून पर्दाफाश

पणजी : हैदराबादहून आंतरराज्य प्रवासी बसमधून गोव्यात आणण्यात येत असलेल्या गांजाच्या तस्करीचा गुन्हा शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १२ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत १२ लाख रुपये आहे.

गुन्हा शाखेच्या पथकाला हैदराबादहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या आंतरराज्य प्रवासी बसमधून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित बसची तपासणी केली. यावेळी दोघांकडे गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजा ताब्यात घेत दोन्ही संशयितांना अटक केली. त्यांच्याविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीमागील नेटवर्कचा तपास सुरू आहे.

हैदराबादहून गोव्यात गांजा आणण्याच्या या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच जप्त केलेला गांजा गोव्यात कोणाला पुरविण्यात येणार होता, याचा शोध गुन्हा शाखेकडून घेतला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा