पेडणे मासळी मार्केटमध्ये स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्या : स्थानिक विक्रेत्यांची मागणी

बाहेरील विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी; पेडणे मासळी मार्केटमध्ये स्थानिक मासळी विक्रेत्यांना बाहेरील गावांमधून येणाऱ्या विक्रेत्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार स्थानिक विक्रेत्यांनी केली आहे. स्थानिक विक्रेत्यांनी व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे व ओळखपत्रे तयार केली आहेत. शासनाच्या नियमांचे पालन केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाहेरील विक्रेते वाढल्याने त्याचा फटका येथील स्थानिक मासळी विक्रेत्यांना बसतो. त्यामुळे बाहेरील मासळी विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक विक्रेत्यांनी केली आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
पेडणे मासळी मार्केटमध्ये स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्या : स्थानिक विक्रेत्यांची मागणी

कोरगाव: पेडणे मासळी मार्केटमध्ये स्थानिक मासळी विक्रेत्यांना बाहेरील गावांमधून येणाऱ्या विक्रेत्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार स्थानिक विक्रेत्यांनी केली आहे. स्थानिक विक्रेत्यांनी व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे व ओळखपत्रे तयार केली आहेत. शासनाच्या नियमांचे पालन केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाहेरील विक्रेते वाढल्याने त्याचा फटका येथील स्थानिक मासळी विक्रेत्यांना बसतो. त्यामुळे बाहेरील मासळी विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक विक्रेत्यांनी केली आहे.

बाहेरील गावांतील विक्रेत्यांनी मासळी विक्रीसाठी येऊ नये असे आमचे म्हणणे नाही; मात्र त्यांनी मर्यादित प्रमाणात मासळी आणून विक्री करावी. मोठ्या प्रमाणात मासळी आणल्यामुळे स्थानिक विक्रेत्यांची मासळी शिल्लक राहते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या उदरनिर्वाहावर होतो, अशी व्यथा विक्रेत्यांनी व्यक्त केली.

संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन स्थानिक मासळी विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे, तसेच बाहेरील विक्रेत्यांनी मर्यादित प्रमाणात मासळी आणून स्थानिक विक्रेत्यांना सहकार्य करावे, अशी मागणी पेडणे मासळी मार्केटमधील स्थानिक विक्रेत्यांनी केली आहे.