क्रिकेट सामन्यांत प्रितेश देसाईंच्या मराठी समालोचनाचा ठसा

क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांचा थरार रंगत असताना तो प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम समालोचक आपल्या आवाजातून करत असतो. गोव्यातील वाळपई येथील प्रितेश देसाई यांनी विशेषत: मराठी समालोचन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी स्टार क्रिकेटर जोंटी रोड्स यांनीही त्यांच्या समालोचनाचे कौतुक केले आहे. यावरूनच त्यांच्या अनोख्या समालोचनाचे महत्त्व लक्षात येते.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
क्रिकेट सामन्यांत प्रितेश देसाईंच्या मराठी समालोचनाचा ठसा

वाळपई : क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांचा थरार रंगत असताना तो प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम समालोचक आपल्या आवाजातून करत असतो. गोव्यातील वाळपई येथील प्रितेश देसाई यांनी विशेषत: मराठी समालोचन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी स्टार क्रिकेटर जाँटी र्‍होड्स यांनीही त्यांच्या समालोचनाचे कौतुक केले आहे. यावरूनच त्यांच्या अनोख्या समालोचनाचे महत्त्व लक्षात येते.



‘‘यंग मॅन यू हॅव अ व्हेरी ब्राईट फ्युचर इन कॉमेंट्री. वेल डन, किप गोईंग’ (“Young Man, you have a very Bright Future in Commentary. Well done, Keep Going” ) अशा शब्दात जाँटी र्‍होड्स यांनी प्रितेश देसाई यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेषत: मराठी समालोचन क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख आहे. ‘क्रिकेट‌िंग व्हॉईस ऑफ वाळपई’ अशी सध्या त्याची ओळख बनली आहे.



गोव्यात हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अनेक नामवंत समालोचक आहेत. मात्र, मराठी समालोचनात प्रितेश देसाई यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या काही जवळच्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. सामन्याची गरज आणि वातावरण लक्षात घेऊन ते अस्खलितपणे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत समालोचन करतात. मात्र, मराठी समालोचनावर त्यांची हुकुमत आहे.



मराठीतील म्हणी, वाक्प्रचार आणि गोमंतकीय मातीशी नाते सांगणारे शब्द यांचा सुरेख वापर करत ते सामन्यांची रंगत वाढवतात. प्रत्येक चेंडू, फटका आणि महत्त्वाच्या क्षणाला आपल्या आवाजातून जिवंत करतात, असे त्यांचे समालोचन ऐकणारे सांगतात.

बॅटपासून मायक्रोफोनपर्यंतचा प्रवास

सत्तरी तालुक्यातील गुळेली गावचे प्रितेश देसाई हे केवळ समालोचक नाहीत, तर स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटूही आहेत. तंत्रशुद्ध फलंदाज आणि कुशल यष्टीरक्षक अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. अनेक चुरशीच्या सामन्यांत आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिल्याचे त्यांचे जवळचे सांगतात.  क्रिकेट हेच त्यांचे पहिले प्रेम. सध्या ते शिक्षकी पेशात कार्यरत असून, काळाच्या ओघात हातातील बॅटची जागा मायक्रोफोनने घेतली आहे. आणि समालोचक म्हणून कार्यरत आहेत.



प्रितेश सामन्यांच्या समालोचासाठी असल्यास आम्ही निर्धास्त असतो असे आयाेजक सांगतात. सामन्याच्या उद्घाटनापासून ते बक्षीस वितरण सोहळ्यापर्यंतची सूत्रे ते सांभाळतात. आपण खेळत असताना प्रितेश समालोचनासाठी असावा, अशी खेळाडुंची भावना असते. गुळेली प्रीमियर लीगपासून त्यांनी समालोचनाला सुरुवात केली. त्यानंतर समालोचनाचे कौशल्य वाढवत आपला वेगळा ठसा निर्माण केल्याचे त्यांचे जवळचे सांगतात.

हेही वाचा
सर्व पहा