कदंबच्या गोवा ते कर्नाटकात तीन वेगवेगळ्या ठिकाणी नव्या बसगाड्या सुरू

४६व्या वर्धापनदिनानिमित्त खास सेवा; कदंब वाहतूक महामंडळाने (केटीसीएल) ४६व्या वर्धापनदिनानिमित्त कर्नाटक राज्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी नवीन बसगाड्या सुरू केल्या आहेत.नवीन सुुरू केलेल्या सेवांमध्ये म्हापसा ते हावेरी, पणजी ते चिक्कोडी आणि वास्को ते इलकल या तीन मार्गांचा समावेश आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
37 mins ago
कदंबच्या गोवा ते कर्नाटकात तीन वेगवेगळ्या ठिकाणी नव्या बसगाड्या सुरू

पणजी : कदंब वाहतूक महामंडळाने (केटीसीएल) ४६व्या वर्धापनदिनानिमित्त कर्नाटक राज्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी नवीन बसगाड्या सुरू केल्या आहेत. (Kadamba Transport Corporation Ltd KTCL) नवीन सुुरू केलेल्या सेवांमध्ये म्हापसा ते हावेरी, पणजी ते चिक्कोडी आणि वास्को ते इलकल या तीन मार्गांचा समावेश आहे. या सेवांमुळे गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त बसपर्याय उपलब्ध होणार आहेत.

तीन नवीन बसमार्गांचे वेळापत्रक

१. म्हापसा–हावेरी : या मार्गावर लक्झरी बस धावणार आहे. बस म्हापसा येथून सकाळी ११ वाजता सुटेल. पणजी येथे दुपारी १२.१० वाजता, तर फोंडा येथे १२.४५ वाजता पोहोचेल. हुबळी येथे सायंकाळी ५.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात हावेरी येथून सायंकाळी ७.४५ वाजता बस सुटेल. बँकापूर, शिग्गाव आणि हुबळीमार्गे ही सेवा चालवली जाईल.

२. पणजी–चिक्कोडी : या मार्गावर सेमी-लक्झरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. पणजी येथून सकाळी १० वाजता सुटणारी बस म्हापसा, डिचोली, साखळी, चोर्ला घाट, बेळगाव, हट्टर्गी आणि करोषीमार्गे चिक्कोडी येथे जाणार आहे. बेळगाव येथे दुपारी ४.१५ वाजता पोहोचण्याचे नियोजन आहे. परतीच्या प्रवासासाठी चिक्कोडी येथून सकाळी ७.१५ वाजता बस सुटेल.

३. वास्को–इलकल : या मार्गावरही सेमी-लक्झरी बस धावणार आहे. वास्को येथून सकाळी ७ वाजता सुटणारी बस पणजी, म्हापसा, डिचोली, साखळी, चोर्ला घाट, बेळगाव, बागलकोट आणि हुंडगुंगा मार्गे इलकल येथे जाणार आहे. परतीच्या प्रवासात इलकल येथून सकाळी ९.३० वाजता, बागलकोट येथून ११.१५ वाजता आणि बेळगाव येथून दुपारी ३.३० वाजता बस सुटेल.  गोवा आणि कर्नाटकदरम्यानची सार्वजनिक वाहतूक अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने कदंब महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा
सर्व पहा