काही सरकारी कार्यालयांत प्यून झाले बॉस : मुख्यमंत्री

कार्यक्षम प्रशासनासाठी त्यांना वठणीवर आणणे गरजेचे; ‘दक्षता सप्ताह २०२६’मध्ये मुख्यमंत्र्यांचे आवाहन; सरकारी कार्यालयात काही ठिकाणी प्यून बॉस झाले आहेत; त्यांना वटणीवर आणणे गरजेचे आहे. सरकारी कार्यालयांची कार्यक्षमता, विश्वासाहर्ता वाढवण्यासाठी ही गाेष्ट गांभीर्याने घेेऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 mins ago
काही सरकारी कार्यालयांत प्यून झाले बॉस : मुख्यमंत्री

पणजी : सरकारी कार्यालयात काही ठिकाणी प्यून बॉस झाले आहेत; त्यांना वठणीवर आणणे गरजेचे आहे. सरकारी कार्यालयांची कार्यक्षमता, विश्वासाहर्ता वाढवण्यासाठी ही गाेष्ट गांभीर्याने घेेऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी सांगितले. 

सरकारी पातळीवर आयोजित केलेल्या ‘दक्षता सप्ताह २०२६’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना वरील माहिती दिली. ‘भ्रष्टाचार मुक्त गोवा, स्वयंपूर्ण गोवा’ करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्यांकडे चांगल्या भाषेत बोलणे गरजेचे आहे. त्यांना चांगली वागणूक देणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी प्यून बॉस झाले असून, नाही तो आज मिळणार नाही, अशा अरेरावीच्या भाषेत बोलताना आपण पाहिले आहे. हे काम आज होणार नाही. हे का झाले आहे तर खात्यातील प्रमुख त्यांना कधी काही विचारतच नाही.

खाते प्रमुख येतात जातात पण आपण त्याच ठिकाणी असल्याने आपणच बॉस असे त्यांना वाटते. काही दिवसांनी हा जाणार असे ते म्हणतात. नाहीतर आपण मंत्र्यांकडे जाऊन त्यालाच येथून पळवून लावतो, असे सांगणारेही काहीजण आहेत. प्यून बॉस झाले आहेत त्यांना वटणीवर आणल्यावरच या गोष्टी सुरळीत होणार. काही वेळा अशा लोकांमुळे दाेष तुमच्यावर येतो, हवे तर मी खाते सांगू शकतो.

मला माहित आहे की कुणी असा घोळ घातला आहे व वरील लोक त्रासात पडले आहेत. हवे तर मी खात्यासहीत हे सांगू शकतो पण सांगत नाही. काय भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यासहीत सांगू शकतो. मी ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी समजले की ती हीच माणसे आहेत. मागे एसआयटी जमीन घोटाळा झाला त्यावेळी १२ ते १३ सरकारी अधिकारी नाहक यात अडकले.

काहीजण त्यात नसणारही पण तुमच्या नजर चुकीमुळे किंवा लक्ष न दिल्याने त्रासात पडू नये म्हणून आपल्या कामाकडे प्रामाणिकपणे पाहिल्यास चांगले होणार. खाते प्रमुखांनी आपली ‘ड्युटी’, प्रक्रिया सुटसुटीत केली आणि अंतर्गत तपासणी केली तर आपण चांगले प्रशासन लोकांना देऊ शकणार.

भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे ज्या वेळी प्रकरणे जाणार; त्यावेळी आपल्या अधिका जावे लागणार नाही, अशी माझी अपेक्षा आहे. दक्षता खात्याकडे प्रकरणे सर्वसामान्य लोक घालत नाहीत तर आपलेच माहित असलेले लोक घालत असतात, त्यामुळे दक्ष रहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात आम्ही ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढवू पाहत आहोत, सर्व खात्यांमध्ये तो वाढणार त्यावेळी सर्वत्र वाढणार असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.  

हेही वाचा
सर्व पहा