मोपा विमानतळावर प्रवाशाच्या पॉवर बँकेत लपवलेली ई-सिगारेट जप्त; गुन्हा दाखल

मुंबईला जाणाऱ्या ३५ वर्षीय प्रवाशाची सुरक्षा तपासणीदरम्यान ई-सिगारेट सापडली; मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Manohar International Airport MOPA) प्रवाशाच्या सुरक्षा तपासणीदरम्यान पॉवर बँकेच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेली इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट) आढळून आल्याने मोपा विमानतळ पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
35 mins ago
मोपा विमानतळावर प्रवाशाच्या पॉवर बँकेत लपवलेली ई-सिगारेट  जप्त; गुन्हा दाखल

पणजी : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Manohar International Airport MOPA) प्रवाशाच्या सुरक्षा तपासणीदरम्यान पॉवर बँकेच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेली इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट) आढळून आल्याने मोपा विमानतळ पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर प्रवाशांची तपासणी करत असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) (CISF)  जवानांना एका प्रवाशाकडे पॉवर बँकेच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेली ई-सिगारेट आढळली. संबंधित प्रवासी ३५ वर्षांचा असून तो मुंबईचा रहिवासी आहे. त्याला इंडिगोच्या 6E5018 या विमानाने मुंबईला प्रवास करायचा होता.

सुरक्षा तपासणीदरम्यान ई-सिगारेट आढळल्यानंतर ही बाब संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर मोपा विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली.

दरम्यान, संबंधित प्रवाशाला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा