चालकाला डुलकी लागली?; स्कॉर्प‌िओ उलटली

पोरास्कडे-पेडणे येथे अपघातात वाहनाचे मोठे नुकसान; पोरास्कडे-पेडणे महामार्गावरील रेल्वे पुलाखाली गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वाहनाने रेल्वे सुरक्षा खांब्याला जोरदार धडक दिली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
चालकाला डुलकी लागली?; स्कॉर्प‌िओ उलटली

कोरगाव : पोरास्कडे-पेडणे (Pernem Taluka) महामार्गावरील रेल्वे पुलाखाली गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वाहनाने रेल्वे सुरक्षा खांब्याला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कारमधील सहाही प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली.

अपघातग्रस्त स्कॉर्पिओमध्ये महिला, दोन लहान मुले, एक वृद्ध व्यक्ती आणि चालकासह एकूण सहा जण प्रवास करत होते. स्कॉर्पिओ महाराष्ट्र पासिंगची असून, गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताची तीव्रता पाहता कारमधील सर्व प्रवासी दैव बलवत्तर म्हणून वाचल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा