ग्रॅज्युएट तसेच १२ वी झालेल्या उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध पोस्ट भरायच्या आहेत. साधारणपणे ३०,००० पोस्ट यातून भरायच्या आहेत. एन.टी.पी.सी. - ग्रॅज्युएट आणि नॉन ग्रॅज्युएट अशा या पोस्ट आहेत. २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. भारतीय रेल्वेमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदासाठी उमेदवार भरले जातात. टेक्निकलसाठी डिप्लोमा इंजिनिअर, पदवी इंजिनिअर, टेक्निशियन, आयटीआय आणि एमटेक तथा आयआयटीपर्यंत शिक्षण असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना कामाची संधी असते. स्पर्धा परीक्षांतून हे विद्यार्थी निवडले जातात. नॉन टेक्निकल पदावर इतर विषयातील पदवीधर तसेच १२ वी झालेले उमेदवार घेतले जातात.
रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत भारतात विभागावार रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड प्रस्थापित केलेले आहेत. गोव्यासाठी मुंबई आरआरबी संस्था काम करते. या अंतर्गत त्या त्या भागातील रेल्वेसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. अर्थात भारतातील कोणताही उमेदवार कोणत्याही आरआरबीच्या परीक्षांना बसू शकतो. एन.टी.पी.सी. अर्थात नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी या पदांसाठी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सचे पदवीधर तसेच १२ वी झालेले विद्यार्थी / उमेदवारांना नॉन टेक्निकल पदासाठी निवडले जाते. यंदा सुमारे ३०,००० पोस्ट भरायचे आहेत. साधारणपणे वय वर्षे १८ ते ३२ वयापर्यंत कितीही वेळा ही परीक्षा देता येते.
बहुपर्यायी प्रश्न (MCQ) पद्धतीने परीक्षा घेतली जाती, ज्याला उत्तर चुकल्यास निगेटिव्ह मार्किंग असते, त्यामुळे नीट अभ्यास करूनच या परीक्षेला बसावे लागते. आरआरबीच्या संकेतस्थळावरून संपूर्ण जाहिरात तसेच अॅप्लिकेशन ऑनलाइन पद्धतीने भरावे लागते. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, जुनियर अकाउंट असिस्टंट तथा टायपिस्ट, सिनियर क्लार्क कम टायपिस्ट अशा पोस्ट भरायच्या आहेत. या ऑफिसर ग्रेडच्या पोस्टी प्रकारात मोडणाऱ्या पोस्ट आहेत. यांची परीक्षा तीन स्तरांवर होते—कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट (स्क्रीनिंग), कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट (मेन) आणि स्किल टेस्ट / टायपिंग / मेडिकल. अशा पद्धतीने परीक्षा घेतली जाते. सीबीटी-१ मध्ये दीड तासात १०० बहुपर्यायी प्रश्न सोडवावे लागतात. यात १/३ निगेटिव्ह मार्किंग असते. जनरल अवेअरनेस, मॅथ्स, रिझनिंग, इंटेलिजन्स यावर प्रश्न असतात. ही परीक्षा पास झाली की सीबीटी-२ ला बसावे लागते. यात परत दीड तासात १२० प्रश्न सोडवायचे असतात. येथेही निगेटिव्ह मार्किंग असते. पास झाले की पुढे स्किल टेस्ट आणि सिलेक्शन होते व पोस्टिंग होते.
गणितामध्ये नंबर सिस्टीम, डेसिमल फ्रॅक्शन, एलसीएम, एचसीएफ, रेशो आणि प्रोपोर्शन, मेन्सुरेशन, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, प्रॉफिट-लॉस, सिंपल अँड कंपाउंड इंटरेस्ट, ज्योमेट्री, स्टॅटिस्टिक्स, अल्जेब्रा, ट्रिगोनोमेट्री, एनॉलॉजी, कोडिंग-डिकोडिंग, पझल्स, डायरेक्शन्स, ब्लड रिलेशन, रँकिंग, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट अँड अजंप्शन्स, करंट अफेअर्स, इतिहास, भूगोल, विज्ञान (१० वी पर्यंतचे) असे विषय असतात. नियमित सराव आणि मार्गदर्शन घेतले की विषय पक्के होतात.
आरआरबीच्या वेबसाईटवर जावे. तेथे सर्व नोटिफिकेशन नीट वाचणे, फॉर्म भरणे, ऑनलाइन अर्ज करणे, परीक्षा व सिलॅबसची संपूर्ण माहिती तिथे असते. परीक्षा कधी, कुठे, सर्वांच्या सर्व पीडीएफ नोटिफिकेशनमध्ये असते. रेल्वे ही सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे, चांगला पगार, राहिला क्वार्टर्स, खूप सुविधा-सवलती, पेन्शन येथे मिळते. भारतात १५ लाख लोक रेल्वेमध्ये कामाला आहेत, जणू भारतात अवघा गोवा येथे काम करतो; कारण गोव्याची लोकसंख्या तेवढीच आहे. परंतु रेल्वेत एकही गोमंतक औषधाला देखील सापडणार नाही, काही काही अपवाद असतील परंतु खूपड्या मुलांना याचे एकतर ज्ञान नाही किंवा आकर्षण नाही. स्पर्धा परीक्षांमधील युपीएससी मार्फत घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा रेल्वे कर्मचारी भरती असते. गोव्याला कोकण रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे, सेन्ट्रल रेल्वे, मुंबई मेट्रो-लोकल खूप संधी आहे. पण ती घेतली पाहिजे. नुसतं मला गोव्याताच नोकरी, ते पण सरकारी, ती पण घरा जवळ, ती पण निवांत, ती पण मलिद्या वाली अशीच मिळाली पाहिजे हा नाद तरुणांनी आता तरी सोडावा. गाव सोडावा मग बघा अख्या भारतात आपण नाव करू शकता. रेल्वेच्या या संधीचा फायदा तरी उचला. ही एक परीक्षा देऊन तरी बघा. हल्ली हल्लीच आर.आर.बी. रेल्वेतर्फे नूतन परीक्षा घेण्यात येत आहेत. स्टेशन मास्टर पदासाठी १२५० पदे भरली जाणार आहेत. कोणतीही पदवीधर या परीक्षेला बसू शकतो. नोव्हेंबर अखेर पर्यंत अॅप्लिकेशन फॉर्म भरणे गरजेचे आहे. यात सी.बी.आर.टी. परीक्षा व सायको टेस्ट देणे गरजेचे आहे. उमेदवारांनी rrb.indianrailways.gov.in या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी.



