वास्को : मुरगाव तालुक्यातील ११ वर्षीय मुलीवर २०२३ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून वेर्णा पोलिसांनी ४६ वर्षीय संशयिताला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याबाबत कोणाला सांगितल्यास मुलीला ठार मारून जंगलात फेकून देण्याची धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ६५(२), ७४, ७५(२), ७६ आणि ३५१(३), गोवा बाल कायद्याच्या कलम ८(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंद करून संशयिताला अटक केली आहे.
वेर्णा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सपना गावस पुढील तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली आणि मुरगाव उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.


