जीसीएच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला चिखली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

तब्बल २६२ मुले, मुलींकडून नोंदणी

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 09:08 pm
जीसीएच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला चिखली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
🏏 गोवा क्रिकेट उन्हाळी शिबिर

पणजी : न्यू वाडे स्पोर्ट्स क्लब आणि गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने 🏟️ एसएजी मैदान, चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रिकेट कोचिंग शिबिरासाठी तब्बल २६२ मुले व मुलींनी नोंदणी केली असून, याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिबिराचे उद्घाटन जीसीएचे संयुक्त सचिव रुपेश नाईक, न्यू वाडे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष यातीन कामुर्लेकर, तसेच वास्को येथील जीसीए संलग्न क्लब्सचे अध्यक्ष, सचिव, प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटूंनी उपस्थित राहून केले. 👏

🌟 दिनेश मोंगिया यांचे मार्गदर्शन

उद्घाटनावेळी विशेष आकर्षण ठरले ते माजी भारतीय क्रिकेटपटू व गोवा रणजी संघाचे प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. 🎯 त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनुभव सांगून युवा खेळाडूंना मेहनत, शिस्त आणि चिकाटीचे महत्त्व पटवून दिले.

हा उपक्रम जीसीएच्या कार्यकारिणी अध्यक्ष विपुल फडके, सचिव शांभा देसाई, खजिनदार दया पागी, संयुक्त सचिव रुपेश नाईक आणि सदस्य राजेश पटणेकर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. 🤝

जीसीएकडून राज्यातल्या ग्रामीण व नागरी भागात क्रिकेटच्या पायाभूत विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. 🌱 या शिबिरामुळे गोव्यातील तरुण खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षण मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.