पर्वरी गोळीबार प्रकरणातील संशयित सतीश शिंदे उच्च न्यायालयात

बेकायदेशीर अटक केल्याचा दावा; याचिकेवर आज सुनावणी; पर्वरी येथील निओ मेजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित सतीश शिंदे यांनी अटकेविरोधात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीररित्या अटक केल्याचा दावा करत शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14 mins ago
पर्वरी गोळीबार प्रकरणातील संशयित सतीश शिंदे उच्च न्यायालयात

पणजी : पर्वरी येथील निओ मेजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित सतीश शिंदे यांनी  अटकेविरोधात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीररित्या अटक केल्याचा दावा करत शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पर्वरी येथील कॅसिनो संचालकावर गोळीबार झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रॅंचकडून सुरू आहे. या प्रकरणात संशयित म्हणून सतीश शिंदे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करीत उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर आज मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  त्यामुळे न्यायालय या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

गोळीबाराच्या या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई, अटकेची प्रक्रिया आणि संबंधित कायदेशीर बाबी याबाबत सुनावणीदरम्यान युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शिंदे यांच्या अटकेसंदर्भातील पुढील कायदेशीर स्थिती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पर्वरी गोळीबारप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोघा शूटरचा समावेश आहे. २८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४७ वाजता वरील गोळीबारप्रकरण घडल्यानंतर एकच खळबळ माजली होती. 

हेही वाचा
सर्व पहा