मेरशीतील नाट्यकलाकार विजेश नार्वेकर यांचे निधन

सायंकाळी ४ वाजता अंतिम संस्कार; मेरशी येथील नाट्यकलाकार विजेश विनोद नार्वेकर (४३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने नाट्य क्षेत्रासह मेरशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
मेरशीतील नाट्यकलाकार विजेश नार्वेकर यांचे निधन

पणजी : मेरशी येथील नाट्यकलाकार विजेश विनोद नार्वेकर (४३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने नाट्य क्षेत्रासह मेरशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नार्वेकर हे नाट्य क्षेत्रात सक्रिय होते. आपल्या अभिनयातून त्यांनी रसिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नाट्य क्षेत्रातील सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केला.

वयाच्या अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे. मेरशी येथील स्मशानभूमीत सायंकाळी ४ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा