पंचायतींच्या ‘ट्रेड लायसन्सला’ आता शुल्काची मर्यादा

सरकारकडून अधिसूचना जारी : हरकतींसाठी १५ दिवसांची मुदत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st September, 10:38 pm
पंचायतींच्या ‘ट्रेड लायसन्सला’ आता शुल्काची मर्यादा

दुकान, हॉटेल आणि इतर उद्योगांसाठी परवाना शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य पंचायतींना असले तरी, यापुढे या शुल्कावर कमाल मर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. यानुसार सरकारने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क आता कोणत्याही पंचायतीला आकारता येणार नाही.

पंचायतींच्या परवाना शुल्काला कमाल मर्यादा

राज्यात ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाच्या पंचायती असून त्यांच्यासाठी वेगवेगळी कमाल शुल्क मर्यादा निश्चित केली जाणार आहे. यानुसार ‘अ’ दर्जाच्या विकसित पंचायतींना ‘ब’ दर्जाच्या पंचायतींपेक्षा अधिक शुल्क आकारण्याची मुभा असेल.

यासंदर्भात पंचायत राज कायद्याच्या नियमांमध्ये बदल करणारी प्रस्तावित अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संबंधितांना हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, मुदत संपल्यानंतर आलेल्या सूचनांचा विचार करून कमाल परवाना शुल्क निश्चित केले जाईल.

१५ दिवसांत हरकती-सूचना सादर करता येणारप्रस्तावित नियमांवर संबंधितांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्त सूचनांचा विचार करून कमाल परवाना शुल्क निश्चित केले जाणार आहे.
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निर्णय

यापूर्वी शुल्कावर कोणतीही मर्यादा नसल्याने दुकान, हॉटेल, सुपर मार्केट, पेट्रोल पंप आदींसाठी पंचायती आपल्या सोयीनुसार शुल्क आकारत होत्या. कळंगुट पंचायतीने एका व्यापारी आस्थापनाला मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले होते. ते भरणे शक्य न झाल्याने संबंधित व्यापाऱ्याने न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यावेळी न्यायालयाने पंचायत संचालनालयाकडे शुल्क निश्चितीच्या निकषांबाबत विचारणा केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार संचालनालयाने कमाल परवाना शुल्क निश्चित करण्याचा निर्णय घेतला.

दंडाची तरतूद अन् ठराव सक्तीचा

व्यावसायिक शुल्काबाबतचा प्रस्तावित मसुदा तयार करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, परवाना शुल्क न भरता उद्योग किंवा व्यवसाय सुरू केल्यास ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच, परवाना शुल्काबाबत पंचायत मंडळाला रीतसर ठराव संमत करणे बंधनकारक असणार आहे.

‘अ’ आणि ‘ब’ दर्जाच्या पंचायतींसाठी प्रस्तावित कमाल शुल्क

व्यवसाय / आस्थापना‘अ’ पंचायत‘ब’ पंचायत
दुकान/व्यावसायिक आस्थापना : १५ चौ.मी.पर्यंतरु. ५० प्रति चौ.मी.रु. ३० प्रति चौ.मी.
१५ ते ५० चौ.मी.रु. ८० प्रति चौ.मी.रु. ५० प्रति चौ.मी.
५० ते १०० चौ.मी.रु. १२० प्रति चौ.मी.रु. ८० प्रति चौ.मी.
१०० चौ.मी.पेक्षा अधिकरु. १५० प्रति चौ.मी.रु. १०० प्रति चौ.मी.
मेगा रिटेल स्टोअर/शोरूमरु. २०० प्रति चौ.मी.रु. १२० प्रति चौ.मी.
कॉर्पोरेट/बँक कार्यालयरु. २०० प्रति चौ.मी.रु. १२० प्रति चौ.मी.
खासगी क्लिनिक/कन्सल्टन्सीरु. १०० प्रति चौ.मी.रु. ६० प्रति चौ.मी.
नक्षत्री हॉटेलरु. २,००० प्रति रूमरु. १,५०० प्रति रूम
गेस्ट हाऊस/बुटीक हॉटेलरु. ८०० प्रति रूमरु. ५०० प्रति रूम
लॉज/होम स्टेरु. ४०० प्रति रूमरु. २५० प्रति रूम
एसी रेस्टॉरंटरु. २०० प्रति चौ.मी.रु. १५० प्रति चौ.मी.
जनरल रेस्टॉरंटरु. १०० प्रति चौ.मी.रु. ७० प्रति चौ.मी.
बेकरी/चहाचा गाडारु. ५० प्रति चौ.मी.रु. ३० प्रति चौ.मी.
कॅसिनो/ऑफशोर कॅसिनोरु. ५,००० प्रति चौ.मी.रु. ३,५०० प्रति चौ.मी.
क्लब/डिस्कोथेकरु. १,५०० प्रति चौ.मी.रु. १,००० प्रति चौ.मी.
मल्टिप्लेक्स/थिएटररु. १५० प्रति चौ.मी.रु. १०० प्रति चौ.मी.
मोबाईल गाडारु. १,२०० प्रति चौ.मी.रु. ६०० प्रति चौ.मी.
बीच शॅकरु. १५,००० प्रति हंगामरु. १०,००० प्रति हंगाम
वॉटर स्पोर्ट्सरु. १०,००० वार्षिकरु. ७,००० वार्षिक
कारखाना/उद्योगरु. १०० प्रति चौ.मी.रु. ७० प्रति चौ.मी.
ऑटो गॅरेज/वर्कशॉपरु. ८० प्रति चौ.मी.रु. ५० प्रति चौ.मी.
स्टोन क्रशररु. २५,००० वार्षिकरु. १५,००० वार्षिक
गॅस गोदाम/रसायनेरु. ३०० प्रति चौ.मी.रु. २०० प्रति चौ.मी.
स्क्रॅप यार्ड/जंक यार्डरु. १५० प्रति चौ.मी.रु. १०० प्रति चौ.मी.
फिश/मीट प्रक्रियारु. १२० प्रति चौ.मी.रु. ८० प्रति चौ.मी.
टेलिकॉम टॉवर्सरु. ५०,००० वार्षिकरु. ३०,००० वार्षिक
पेट्रोल पंपरु. ३०,००० वार्षिकरु. २०,००० वार्षिक
इतर व्यावसायिक आस्थापनारु. ६० प्रति चौ.मी.रु. ४० प्रति चौ.मी.

टीप : वरील दर प्रस्तावित कमाल परवाना शुल्कानुसार आहेत.

हेही वाचा
सर्व पहा