एलडीसीसह २१५ पदांसाठी जाहिरात

सरकारी खात्यांमध्ये एलडीसीसह विविध प्रकारच्या २१५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. डीटीपी ऑपरेटरची ३, एलडीसीची १९७, डेटा एंट्री ऑपरेटरची २, तर ज्युनियर असिस्टंटची १३ पदे भरण्यात येणार आहेत.


04th September, 11:43 pm
एलडीसीसह २१५ पदांसाठी जाहिरात

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : सरकारी खात्यांमध्ये एलडीसीसह विविध प्रकारच्या २१५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. डीटीपी ऑपरेटरची ३, एलडीसीची १९७, डेटा एंट्री ऑपरेटरची २, तर ज्युनियर असिस्टंटची १३ पदे भरण्यात येणार आहेत.
गोवा कर्मचारी भरती आयोगाने या पदांसाठी संक्षिप्त जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तपशीलवार जाहिरात काही दिवसांत प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठीचे पोर्टल ११ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होणार असून, ऑनलाइन अर्ज २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
डेटा एंट्री ऑपरेटर आणि डीटीपी ऑपरेटरची सर्व पदे सर्वसाधारण गटासाठी आहेत. या पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. परीक्षेची तारीख काही दिवसांनंतर जाहीर केली जाणार आहेत. पदांसाठी पात्रता नसलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये, असे कळविण्यात आले आहे.
एलडीसीच्या १९७ पैकी १०९ पदे सर्वसाधारण गटासाठी
जाहीर करण्यात आलेल्या २१५ पदांपैकी १९७ पदे एलडीसीची आहेत. त्यापैकी १०९ पदे सर्वसाधारण गटासाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) २५, अनुसूचित जातीसाठी (एससी) ४, इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) ४४, तर आर्थिकदृष्ट्या मागास गटासाठी (ईडब्ल्यूएस) १५ पदे राखीव आहेत. एकूण १९७ पदांपैकी दिव्यांगांसाठी २३, गुणवंत खेळाडूंसाठी १, तर माजी सैनिकांसाठी १७ पदे राखीव आहेत.
ज्युनियर असिस्टंटची १३ पदे
ज्युनियर असिस्टंटच्या १३ पदांपैकी ७ पदे सर्वसाधारण गटासाठी आहेत. एसटीसाठी २ आणि ओबीसीसाठी ४ पदे राखीव आहेत. दिव्यांगांसाठी ३, तर माजी सैनिकांसाठी १ पद राखीव आहे.

हेही वाचा
सर्व पहा