शिक्षकांच्या बदलीवरून सांगेतही विद्यार्थ्यांचे आंदोलन; मंत्री फळदेसाईंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

शिक्षकांच्या विषयावरून पेडणे, वाळपई आणि सांगे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील ‌विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या मध्यात शिक्षकांची बदली केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून सांगे बसस्थानकापर्यंत मजल मारली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांगेचे आमदार तथा समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी याठिकाणी येऊन विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी पुन्हा वर्गात गेले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
04th September, 05:53 pm
शिक्षकांच्या  बदलीवरून सांगेतही विद्यार्थ्यांचे आंदोलन; मंत्री फळदेसाईंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

सांगे : शिक्षकांच्या विषयावरून पेडणे, वाळपई आणि सांगे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील ‌विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या मध्यात शिक्षकांची बदली केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून सांगे बसस्थानकापर्यंत मजल मारली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांगेचे आमदार तथा समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी याठिकाणी येऊन विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी पुन्हा वर्गात गेले. 

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात सर्व संबंध‌ितांची बैठक घेतली. या बैठकीला पालक-शिक्षक संघटनेचे (पीटीए) सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर मंत्री फळदेसाई यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक (प्रशासन) तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत‌ि यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यात आला.  

हेही वाचा
सर्व पहा