एफसीआरएच्या जेपीसी समितीवर सदस्य म्हणून खासदार विरियातो यांची निवड

विदेशी निधी नियमन विधेयकाच्या (एफसीआरए) (FCRA) अभ्यासासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) (JPC) सदस्य म्हणून दक्षिण गोवा जिल्ह्याचे खासदार विरीयातो फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20 mins ago
एफसीआरएच्या जेपीसी समितीवर सदस्य म्हणून खासदार विरियातो यांची निवड

पणजी : विदेशी निधी नियमन विधेयकाच्या (एफसीआरए) (FCRA) अभ्यासासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) (JPC) सदस्य म्हणून दक्षिण गोवा जिल्ह्याचे खासदार विरीयातो फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


या समितीत एकूण ३१ सदस्य असून, भाजपचे खासदार डॉ. संजय जयस्वाल यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत लोकसभेत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एफसीआरए दुरुस्ती विधेयक २५ मार्च २०२६ रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते. विधेयकातील तरतुदींना विविध भागधारक तसेच विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर ते अधिक तपासणीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले.

हेही वाचा
सर्व पहा