पर्वरी गोळीबार : संशयितांनी कारमधून केले पलायन

पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोबाहेर शुक्रवारी रात्री कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर हल्लेखोर आणि त्यांच्या साथीदारांनी मारुती सुझूकी एसएक्स ४ कारमधून गोव्याबाहेर पलायन केले. गुन्हा शाखेची पथके कोल्हापूर व इतर ठिकाणी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

5 hours ago
पर्वरी गोळीबार : संशयितांनी कारमधून केले पलायन

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोबाहेर शुक्रवारी रात्री कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर हल्लेखोर आणि त्यांच्या साथीदारांनी मारुती सुझूकी एसएक्स ४ कारमधून गोव्याबाहेर पलायन केले. गुन्हा शाखेची पथके कोल्हापूर व इतर ठिकाणी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
श्रीनिवास नायक यांच्यावर हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले होते. नायक यांच्या सुरक्षारक्षकाने प्रत्युत्तरात तीन राऊंड फायर केले होते. यामुळे घाबरलेल्या हल्लेखोरांनी महामार्ग ओलांडून पळ काढला होता. या हल्ल्यात चार-पाच जणांचा समावेश असून, घटनास्थळी हल्लेखोरांचे दोन ते तीन साथीदार हजर होते. त्यांनीच हल्लेखोरांना घेऊन गोव्याबाहेर पळ काढला. पोलिसांनी केलेल्या तपासात घटनास्थळी पल्सर मोटारसायकल सापडली होती. परिसरातील सीसीटीव्ही तपासणीतून हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी हल्लेखोरांनी परिसराची रेकी केल्याचे दिसले होते.
कार पत्रादेवीतून बांद्याच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट
घटनेवेळी पल्सर आणि मारुती सुझूकी एसएक्स ४ कार आणली होती. हल्लेखोरांनी पल्सर तिथेच ठेवून पळ काढला. पळून जाण्यासाठी त्यांनी कारचा वापर केला. ती कार हल्ला झाला त्यावेळी परिसरात होती; मात्र घटना घडल्यानंतर गायब झाली. सदर कार पत्रादेवी चेकपोस्टवरून बांद्याच्या दिशेने गेल्याचे तपासातून समोर आले. सदर कार कोल्हापूर परिसरात असण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हा शाखेचे पथक बुधवारी कोल्हापूरला रवाना झाले. उत्तर गोवा पोलिसांचे पथक कोल्हापूर परिसरात कार व हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

हेही वाचा
सर्व पहा