‘गोवा कॉंग्रेस पार्टी’च्या सचिवांना उच्च न्यायालयाची नोटीस

गिरीश चोडणकरच्या याचिकेवर बजावली नोटीस; ‘गोवा काँग्रेस पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाच्या नोंदणीविरोधात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायालयाने प्रतिवादी असलेल्या नव्या पक्षाच्या सचिवांना नोटीस जारी केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
‘गोवा कॉंग्रेस पार्टी’च्या सचिवांना उच्च न्यायालयाची नोटीस

पणजी : ‘गोवा काँग्रेस पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाच्या नोंदणीविरोधात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील  सुनावणीसाठी न्यायालयाने प्रतिवादी असलेल्या नव्या पक्षाच्या सचिवांना नोटीस जारी केली आहे.

नव्या पक्षाच्या नोंदणीमुळे काँग्रेस पक्षाच्या नावाशी आणि ओळखीशी संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आक्षेप चोडणकर यांनी याचिकेत घेतला आहे. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित पक्षाच्या सचिवांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. न्यायालयातील सुनावणीत या प्रकरणावर अधिक स्पष्टता होण्याची शक्यता आहे. गिरीश चोडणकर यांनी ‘गोवा कॉंग्रेस पाटी’ या नावाने राजकीय पक्षाची नोंदणी करण्यास आक्षेप घेत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा