पणजी : गोवा टपाल विभागात ‘ग्रामीण डाक सेवका’च्या १३० जागा भरण्यासाठी ऑनलाईन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
जागांमध्ये शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे. २१ सप्टेंबर रोजी संध्याकाली ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
वरिष्ठ डाक अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील टपाल कार्यालयांमध्ये जीडीएस या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इयत्ता दहावीच्या स्तरावर कोकणी किंवा मराठी भाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. तथापि, ज्या उमेदवारांनी केवळ मराठी भाषेचा अभ्यास केला आहे, त्यांना कोकणी भाषेचेही ज्ञान असणे गरजेचे आहे. इच्छुक उमेदवारांनी या लिंकवर अर्ज करावा. : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement


