साखळीत ४ दिवसांत ५ कुत्र्यांचा मृत्यू; विषप्रयोगाचा संशय

डिचोली पोलीस स्थानकात तक्रार; साखळी हाऊसिंग बोर्ड परिसरात गेल्या चार दिवसांत पाच कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुत्र्यांना विष देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14 mins ago
साखळीत ४ दिवसांत ५ कुत्र्यांचा मृत्यू; विषप्रयोगाचा संशय

साखळी : साखळी हाऊसिंग बोर्ड परिसरात गेल्या चार दिवसांत पाच कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुत्र्यांना विष देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा
सर्व पहा