गोवा विधानसभा निवडणूक फेब्रुवारीत : मुख्यमंत्री

विरोधकांच्या गदारोळावेळी मुंख्यमंत्र्यांचा विधानसभेत टोला; गोवा विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये नव्हे, तर फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. विरोधकांकडून विधानसभेत गदारोळ सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
गोवा  विधानसभा निवडणूक फेब्रुवारीत : मुख्यमंत्री

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये नव्हे, तर फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. विरोधकांकडून विधानसभेत गदारोळ सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला.

विधानसभेत चर्चेदरम्यान विरोधकांचा गदारोळ सुरू होता.  त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “निवडणूक डिसेंबरमध्ये नाही, फेब्रुवारीत आहे,” असे सांगत विरोधकांना टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहातील राजकीय वातावरण आणखी तापले.

दरम्यान गोवा विधानसभेच्या तीन दिवसांच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा