बंगल्याजवळील मोकळ्या जागेत बिल्डरने फुलवला भाजीचा मळा

कृष्णा शेट्येंकडून १० वर्षांपासून बाजारातील भाज्यांची खरेदी बंद

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
20th August, 09:10 pm
बंगल्याजवळील मोकळ्या जागेत बिल्डरने फुलवला भाजीचा मळा

फोंडा : खडपाबांध-फोंडा येथील बिल्डर तथा गोवा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णा शेट्ये यांनी गेल्या १०-१२ वर्षांपासून आपल्या बंगल्याजवळ मोकळ्या जागेत भाजी लागवड करण्याचा छंद जोपासला आहे. भेंडी, वाल, तांबडी भाजी, अळसाणे आणि अन्य भाज्यांचे पीक घेत असल्याने बाजारातून भाज्या खरेदी करणे १०-१२ वर्षांपासून बंद झाले आहे. भाज्या लागवड करण्यासाठी कृष्णा शेट्ये यांच्यासह कुटुंबियांचे सहकार्य लाभत असल्याने मित्र- मंडळीकडून प्रोत्साहन मिळत आहे.

फोंडा परिसरात बिल्डर म्हणून परिचित असलेले कृष्णा शेट्ये आपल्या बंगल्याच्या बाजूला आसलेल्या मोकळ्या जागेत गेल्या १०-१२ वर्षांपासून भाज्याची लागवड करीत आहेत. भेंडी, वाल, तांबडी भाजी व अन्य भाज्याचे पीक सर्रास घेत आहेत. त्यामुळे स्वयंपाक घरात लागणाऱ्या भाज्या बाजारातून खरेदी केल्या जात नाहीत. कृष्णा शेट्ये यांच्या मुलासह नातवंडे सुद्धा त्यांना भाज्या लागवड करण्यासाठी मदत करीत असतात. बिल्डर म्हणून काम करीत असताना प्रत्येक दिवशी वेळ काढून भाज्या लागवडीकडे लक्ष देत असतात. त्याचबरोबर भाज्याच्या पानावर लागणाऱ्या किड्यावर वेळोवेळी औषध देण्यात येते.

कृष्णा शेट्ये यांनी गेल्या १०-१२ वर्षांपासून बंगल्याजवळ उपलब्ध आसलेल्या मोकळ्या जागेत भाज्यांची लागवड करण्याचा छंद जोपासला आहे. आई - वडिलांना भाज्या लागवड करण्याचा छंद होता. त्यामुळे भाज्या लागवड करण्याची आवड निर्माण झाली. गेल्या १०-१२ वर्षांपासून विविध प्रकारच्या भाज्या लागवड केल्या जात आहेत. पीक अधिक आल्यानंतर नातेवाईक किंवा मित्र- मंडळींना भाज्या देण्यात येतात.

युवा पिढीने पुढाकार घ्यावा!

युवा पिढीने आपल्या घराजवळ असलेल्या जागेचा वापर करून भाज्यांची लागवड केल्यास बाजारातून भाज्या खरेदी करण्याची वेळ येणार नाही. युवा पिढीने पुढाकार घेण्याची आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा