स्वातंत्र्य दिनानिमित्त तिघांना पदके जाहीर

पोलीस, अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
स्वातंत्र्य दिनानिमित्त तिघांना पदके जाहीर

पणजी : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल गोव्यातील पोलीस, अग्निशमन दलातील  तिघांना विविध पदके जाहीर करण्यात आली आहेत.

गोवा पोलीस सेवेत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश बाबू नाईक यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांना प्रशंसनीय सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. तसेच लीडिंग फायर फायटर (LFF) अरविंद देसाई यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन पदक जाहीर करण्यात आले आहे. या तिघांचेही कुटुंब, सहकारी व मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे व शुभेच्छा देण्यात येत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा