पावसाळी अधिवेशन तीन दिवस चालणार

३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणार अधिवेशन

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
पावसाळी अधिवेशन तीन दिवस चालणार

पणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तीन दिवस चालणार असून, अधिवेशन बोलावण्याबाबतचे समन्स राज्यपालांनी जारी केले आहे. ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर व २०२६ च्या २ सप्टेंबर असे तीन दिवस सभागृहाचे कामकाज चालणार आहे.

फोंडा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मार्चमधील अधिवेशन मुदतीपूर्वीच तहकूब करण्यात आले होते. चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने पावसाळी अधिवेशन किमान १५ दिवसांचे व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली होती. परंतु, हे अधिवेशन फक्त तीन दिवसांचेच होणार असल्याने विरोधकांचा भ्रमनिरास झाला आहे.

मागील मंत्रिमंडळ बैठकीत अधिवेशन बोलावण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. यादरम्यान सर्व प्रलंबित विधेयके संमत केली जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले होते.


हेही वाचा
सर्व पहा