चिखलीत एटीएफ फ्युल टँकर पलटी

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
7 hours ago
चिखलीत एटीएफ फ्युल टँकर पलटी

चिखली : येथील सेंट जॅसिंटो बेटाजवळ बुधवारी विमानाचे अतिज्वलनशील इंधन (ATF) वाहून नेणारा एक टँकर अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या अपघातामुळे टँकरमधून इंधन गळती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी इतरत्र वळवण्यात आली आहे. अपघात नेमका कसा घडला यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा
सर्व पहा