Home >> गोवा >> गोव्यात सोशल मीडियावर 'टर्माईट्स जनता युवा मोर्चा'ची एंट्री

गोव्यात सोशल मीडियावर 'टर्माईट्स जनता युवा मोर्चा'ची एंट्री

ॲड. सावईकरांच्या पोस्टनंतर नवे पेज चर्चेत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यात सोशल मीडियावर 'टर्माईट्स जनता युवा मोर्चा'ची एंट्री

पणजी: गोव्यात सोशल मीडियावर 'टर्माईट्स जनता युवा मोर्चा' या नावाने नव्या पेजची एंट्री झाली आहे. त्याची राज्यभर चर्चा रंगली आहे. भाजपचे नेते  ॲड. नरेंद्र सावईकर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर ‘कॉक्रोचीस विथ द टर्माईट्स सेव्ह नॅशन’ ("Cockroaches with the Termites, Save Nation") अशी पोस्ट केल्यानंतर एकच खळबळ माजली होती.

काल पासून सामाजीक माध्यमांवर यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तर यासंदर्भात आवाज उठवताना कसलीच कसर सोडली नाही.  त्याच पार्श्वभूमीवर 'टर्माईट्स जनता युवा मोर्चा' या नावाचे सोशल मीडिया पेज समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 ॲड. सावईकर यांच्या पोस्टवर विविध स्तरांतून समर्थन आणि टीका अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.  त्यानंतर आता 'टर्माईट्स जनता युवा मोर्चा' या नावाने सोशल मीडियावर सुरू झालेल्या पेजमुळे राजकीय टोलेबाजीला नवे वळण मिळाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या पेजमागे नेमके कोण आहे किंवा त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी अधिकृत संबंध आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या पेजवरील पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रिया वेगाने व्हायरल होत आहे.

विधानसभा निवडणूक साधारण सहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना;  गोव्यात राजकीय चर्चांसाठी नवा विषय मिळाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस झुरळ, वाळवी ही चर्चा बरीच रंगणार आहे.  त्यात गोव्यातील राजकीय क्षेत्र बरेच ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा