Home >> गोवा >> अंजना कामत होणार साखळीच्या नव्या नगराध्यक्ष; मुख्यमंत्र्यांकडून नावाची घोषणा

अंजना कामत होणार साखळीच्या नव्या नगराध्यक्ष; मुख्यमंत्र्यांकडून नावाची घोषणा

कामत यांनी दाखल केला अर्ज; उद्या निवडणूक प्रक्र‌िया

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
अंजना कामत होणार साखळीच्या नव्या नगराध्यक्ष; मुख्यमंत्र्यांकडून नावाची घोषणा

साखळी : साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नगरसेविका अंजना कामत यांच्या नावाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी घोषणा केली आहे. यामुळे अंजना कामत यांच्या नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया बुधवारी (उद्या) पार पडणार असून, त्यासाठी अंजना कामत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर साखळीच्या राजकीय वर्तुळात या निवडीची चर्चा सुरू झाली असून, निवडणूक प्रक्रियेनंतर अंजना कामत यांची नगराध्यक्षपदी अधिकृत निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.