Home >> गोवा >> आमोणा येथे रूममेटवर सुरीने हल्ला; संशयिताला अटक

आमोणा येथे रूममेटवर सुरीने हल्ला; संशयिताला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
42 mins ago
आमोणा येथे रूममेटवर सुरीने हल्ला; संशयिताला अटक

डिचोली : आमोणा येथे दारूच्या नशेत रूममेटवर सुरीने हल्ला केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित कृष्णा यादव (वय ४५, मूळ उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत झालेल्या वादातून कृष्णा यादव याने त्याचा रूममेट प्रेम शंकर (वय ३२, मूळ उत्तरप्रदेश) याच्यावर सुरीने हल्ला केला. या हल्ल्यात प्रेम शंकर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास डिचोली पोलीस करत आहेत.